Saturday, March 5, 2011

'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'

आज सहज दादर ला स्पेक्ट्रा मध्ये गेलो होतो समोरच एक लक्ष वेधून घेणारे सीडी कव्हर नजरेसमोर आले.

'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'
गायक संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी ज्ञानेश वाकुडकर यांचा एक आगळवेगळा प्रयोग...

प्रेयसिच सौंदर्य वर्णन करणार २१ अंतर्‍याच एक सलग गाणं
बापरे!!! वाचूनच टेन्शन आले आधीच आजकालची ५ मिनिटांची गाणी सुद्धा नकोशी वाटतात तिकडे ३६ मिनिटाचे सलग गाणे??

पहिले तर मिलिंद इंगळे यांना सलाम केलाच पाहिजे कारण अशी जोखीम उचलनं खरच... हॅंड्ज़ ऑफ टू मिलिंद सर...

सीडी कव्हरच्या आतील मजकूर पण खूप काही सांगून गेला... मिलिंद इंगळे, ज्ञानेश वाकुडकर आणि प्रायोजक सागर शिरोळे याची नेमकी पण सुंदर अशी प्रस्तावना.... आणि १ ते २१ अंतरे अनुक्रमणिके सहित...

या प्रवासात प्रत्येकाने केलेल्या कामाची पावती त्यांच्या फोटोसहित न विसरता दिली गेली आहे हे विशेष... एकूणच सर्व छान जुळून आले आहे हे समजून आले होतेच...

उत्कंठा वाढत चाललेली म्हणून वेळ वाया न घालवता सीडी ऐकण्यासाठी लॅपटॉप चालू केला.

एका प्रेयसिच इतक छान सौंदर्य वर्णन इतक्या सोप्या शब्दात आणि तेही थोडक्यात नव्हे तर शंभर पानात... भन्नाट!

मिलिंद इंगळे यांचा गुंग करणारा आवाज... धुंद करणारे मधुर संगीत त्याहीपेक्षा प्रत्येक प्रियकराला प्रेयसीची आठवन करून देणारे आपलेसे वाटणारे निरागस शब्द...

प्रेयसी आणि प्रियकर यांनी एकदा तरी ऐकावे ऐकण्यापेक्षा रंगून जावे असे मला मनापासून वाटते...
गेली चार वर्ष प्रचंड मेहेनत करून मिलिंद आणि त्याच्या टीम ने उभं केलेल प्रेयसिच गाव केवळ १०० रु मध्ये उपलब्ध आहे... आपल्या प्रीयकरला आणि प्रेयसीला अजून आपलेसे करण्यासाठी याहून वेगळी भेट अजुन काय असु शकते.

सर्व काही छान झाले असले तरी एक गोष्ट मनाला सल लावते की जर असे निराळे काही येत आहे तर ते लोकांपर्यत त्याच ताकदीने का नाही पोहोचत... या गोष्टीमध्ये मराठी माणूस नेहेमीच मागे पडतोय.. मी ऑनलाइन सर्च केल्यानंतर त्याबद्दल काहीच गवसले नाही सध्याच्या धावत्या युगात मुख्यत: ऑनलाइन अश्या वेगळ्या प्रॉजेक्ट्सना पुढे आणण्याची खूप गरज आहे...

चला हे वाचून काही क्रांती घडली तर याहून आनंदाची गोष्ट काय असावी...

3 comments:

  1. प्रिय निलेश ,
    मनपूर्वक धन्यवाद

    पुन्हा अशी हवा.. नको नको
    मरायला दवा.. नको नको

    तू एकटीच ये.. बसु जरा
    तुझ्यासवे थवा.. नको नको!

    -ज्ञानेश वाकुडकर

    ReplyDelete
  2. वा ज्ञानेशजी...

    तुमचा प्रत्येक शब्द... हवा हवा
    अश्या शब्दात गंध... नवा नवा

    शब्दांची ओंजळ... वाहूदे भरून
    तुमच्या मनातल्या तिला... तेवत ठेवा

    ReplyDelete
  3. मित्रा, या अल्बमची गाणी माझ्याशी शेयर करू शकतोस का?
    माझा email id: hiten_arts@yahoo.com किंवा hiten.8836@gmail.com आहे...........धन्यवाद

    ReplyDelete