Thursday, March 17, 2016

नवी सुरुवात

आज जवळजवळ चार वर्षांनी ब्लॉग लिहितोय...
 तसं रोज लिहावस वाटत पण खूप जास्त बिझी झालोय ( हे आपलं उगाच हा... खर तर आळस भरलेला हो... अजून काही नाही ) असो!...

आपल्याला हव ते करायला मिळण्यासाठी नशीब लागत (मेहेनत, चिकाटी हि)... ते मिळालं तर मात्र त्यातून मिळणार आनंद शब्दात मांडण कठीण तो फक्त अनुभवता येतो बस्स... पण मनाला जे हवं ते केल्यावर पुढे काय ? म्हणजे हवं ते केल ते उत्तम झालंय तरी त्यातून साध्य काय करायचे आहे... आपलं धेय्य नक्की काय आहे... याचा विचार केला पाहिजे... कसंय आपण नकळत आपल्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवण सुरु करतो म्हणून...

मला आठवतंय मी या आधी पण "अपेक्षा" या विषयावर ब्लॉग मध्ये लिहिले होते... प्रत्येक माणसाचे हे असेच होते पूर्वापार चालत असलेल्या ग्रंथापासून, साहित्यातून, लेखकांच्या लेखणीतून किंवा अनेक बाबांच्या प्रवचनातून सर्व हेच ऐकायला, वाचायला मिळत की " कर्म करा फळाची अपेक्षा करू नका, अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या कि दुखः होत... तुम्ही फक्त चालत रहा बाकि सर्व देवावर सोडा" अस आणि बरच काही... तरीही आपण अपेक्षा ठेवण काही सोडत नाही कधी त्या आपल्या माणसांकडून असतात किंवा दुसऱ्यांकडून...

यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्याशी निगडीत आहेत म्हणून मुद्दाम मी लिहितोय... गेल्या २ ते ४ महिन्यात मी दोन लघुपट केलेत खूप काही शिकतोय एक दिग्दर्शक म्हणून परिपक्वता आणण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घडणाऱ्या घटनांमधून एक चांगला माणूस बनण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करतोय... तरीही असे वाटत राहत कि आपण करतोय तो मार्ग योग्य आहे का ? अजून काही केले पाहिजे का ?  कुठे कमी पडतोय का? अति आत्मविश्वास तर नाही ना आलाय?...  हे आणि असे अनेक प्रश्न मनाला पडतात...

कधी कधी मन घाबरत... मनात चलबिचल होते... हृदयाचे ठोके अचानक वाढतात... काहीतरी चुकतय असं वाटू लागत... हसाव कि रडावं काही कळत नाही... हे असे होऊ लागलं कि अचानक लक्षात येत कि छ्या... या विषयांमध्ये अडकून वेळ निघून जातेय... आणि मग नवीन सुरुवात करावीशी वाटते अगदी मनमोकळे पणाने...

एक मात्र नक्की अनुभव तुम्हाला खूप काही देऊन जातो ते चांगले असो वा वाईट... म्हणून कि काय वर लिहिल्याप्रमाणे मी अपेक्षा ठेवण कमी केलय ( अपेक्षा ठेवण बंद करण्यासाठी वेळ जाईल )... जे मनात आहे ते तसाच्या तसं जगासमोर मांडायचे मस्त एकदम... त्यानंतर त्याचा result काय असेल याची पर्वा सोडायची... हे एकदम मनात पक्क केलय ... म्हणूनच एक नवीन सुरुवात करतोय नव्याने...