Thursday, September 21, 2017

विकृती

लाखो लोक आणि त्यांच्या डोक्यात असलेले करोडो विचार.. अस्वस्थ करणारे, विचार करायला लावणारे, हसवणारे, स्वतःचच हसू करू घेणारे... चीड आणणारे असे अगणिक...

स्वतःच वेगळेपण टिकवून ठेवणाऱ्यांपासून ते आपला टिकाव टिकून राहावा म्हणून धडपडणारे... सोशल मीडिया वर प्रसिद्धी मिळत रहावी जास्तीत जास्त लाईक आणि कॉमेंट्स मिळाव्या म्हणून किमान 12 ते कमाल 20 तास ऑनलाईन असणारे...

नक्की काय हवंय आपल्याला? काय शोधतोय आपण? कुठे जायचे आहे आपल्याला? काय कमवायचे आहे?

आज परेल येथे जी दुर्घटना घडली त्याचा विडिओ सर्व न्यूज वर दाखवतायत त्यात अनेक लोक आपल्या मोबाईल वर व्हिडीओ करताना दिसतायत...

कोणीतरी दुःखात आहे, कोणीतरी मरतोय, कोणावर तरी अतिप्रसंग ओढवतोय आणि त्यावेळी व्हिडीओ करणारे असे सामान्य आहेत का? नक्की सामान्य म्हणायचं का त्यांना? तुमच्या समोर एखादी दुर्घटना घडत असताना तुम्ही इतकं नॉर्मल राहू शकता? मन अस्वस्थ होतं असं काही दिसलं की पाहिलं की माणूस माणुसकी विसरतोय की घाबरतोय मदतीचा हात द्यायला काहीच कळत नाहीये...

एखाद्या घटना स्थळी मोबाईल वर विडिओ करत बसणं ही खरंच एक विकृती आहे यावर वेळीच आवर घालता आला पाहिजे... आपण नकळत या गोष्टींचं व्यसन लावून घेतलं आहे समाजासाठी आपण जरी काही करू शकलो नाही तर निदान समाजाला घातक ठरेल अश्या गोष्टी तरी टाळा...